शेतीची भावी दिशा
श्रीमंत तसेच गरीब देशातील शेतीमध्ये एकलपीक पद्धतीऐवजी बहुपीक पद्धतीचा स्वीकार, रासायनिक खते व शेतीतील अन्य निविष्टे ह्यांचा कमी वापर, लहान शेतकऱ्यांना अधिक साह्य आणि उत्पादन व वापर ह्यांच्या बाबतीत स्थानिक बाबींवर भर, असे परिवर्तन करणे आता अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी छोट्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणाऱ्या आणि ग्रामीण विकासास चालना देणाऱ्या, शेतीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या शाश्वत उत्पादनपद्धतींचा वापर …